नवप्रतिभा महाविद्यालयात भाषिक पंधरवडा संपन्न
नागपूर: नवप्रतिभा महाविद्यालय, आयुर्वेदिक लेआउट, मिरची बाजार, नागपूर येथे दिनांक 16 जानेवारी 2024 ते 2 फेब्रुवारी 2024 यादरम्यान वैविध्यपूर्ण भाषिक पंधरवडा संपन्न झाला. या पंधरवड्याचे उद्घाटक कमला नेहरू महाविद्यालयाचे करिअर कट्टा समन्वयक व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. एस. डी. देशभरात हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून नूतन आदर्श महाविद्यालय उमरेड येथील मराठी विभागाचे डॉ. विलास गजबे हे उपस्थित होते. आणि अध्यक्ष म्हणून जीवनविकास एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री. वसंतराव झाडे हे उपस्थित होते. या उपक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. देशभ्रतार सरांनी आजच्या स्पर्धेत विद्यार्थी टिकून कसा राहील व त्यासाठी त्यांनी वेळापत्रक ठरवून आपले ध्येय कसे गाठावे यावर भाष्य केले, तर डॉ. विलास गजबे यांनी भाषिक पंधरवड्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देताना आज भाषिक कौशल्याद्वारे आपल्याला करिअर कसे गाठता येईल, यावर विचार व्यक्त केले. भाषिक पंधरवड्याचे पंधरा दिवस कार्यक्रम घेण्यात आले असून त्यात निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वाचन स्पर्धा, मराठी गाण्याची अंताक्षरी, ग्रंथप्रदर्शन, शारीरिक स्पर्धा, पथनाट्य, कविसंमेलन आदी कार्यक्रमासोबतच दि. 23 जाने. 2024 ला ‘…मरावे परी अवयव रुपी उरावे’ हा उद्बोधक कार्यक्रम डॉ. सुशील मेश्राम, सेवादल महिला महाविद्यालय, नागपूर यांच्या प्रमुख वक्तव्याने विशेष गाजला. त्यात विद्यार्थ्यांच्या मरणोत्तर जीवनदानाचे महत्त्व समजावताना विद्यार्थ्यांमध्ये अवयव दानाचे महत्त्व पटवून दिले. दि. 24 जाने. 2024 ला ‘व्यवहारातील वाणिज्य भाषा’ या विषयावर सहा. प्रा. रोशन माटे यांनी व्यवहारात मराठी भाषेचा उपयोग करताना बँकेच्या व्यवहारापासून तर सामाजिक संस्था व कंपन्यांमधील व्यवहारासाठी वापरलेल्या इंग्रजी शब्दाचे मराठी भाषिक पर्याय सांगून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकले. श्रीनिकेतन महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागप्रमुख डॉ भारती गोस्वामी, यांनी नवीन शैक्षणिक धोरणात पदवीधर विद्यार्थ्यांनी क्रेडिट बेस चॉईस प्रमाणे विषय कसे निवडावे आणि कौशल्याधारे आपली पदवी कशी मिळवावी यावर भाष्य केले, तर इंग्रजी विभागप्रमुख डॉ कांचन जोशी यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची नीव कौशल्यावर आधारित असल्यामुळे आज रोजगाराभिमुख शिक्षणावर भर देणारे हे शिक्षण असल्याने आपले शैक्षणिक कार्य नेटाने पूर्ण करून करिअर गाठावे असा मौलिक सल्ला दिला. यात मराठी विभागप्रमुख डॉ मुरलीधर गवळी विशेष उपस्थित होते. डॉ राजेंद्र मालोकर, हिंदी विभाग प्रमुख यांनी संचालन केले, तर नवप्रतिभा महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख सप्रा सतीश राठोड यांनी आभार मानले. दि. 29 जानेवारी 2024 ला समाजशास्त्र विभागाच्या अभ्यास मंडळाचे उद्घाटन डॉ मोहन नगराळे, आर एस मुंडले धरमपेठ महाविद्यालय यांच्या हस्ते करण्यात आले . त्यात विद्यार्थ्यांची कार्यकारिणी तयार करून विद्यार्थ्यांना समाजभिमुख मंडळ कसे कार्य करेल यावर भाष्य केले. दि 30 जानेवारी 2024 ला महात्मा यांच्या पुण्यतिथी निमित्त सद्भावना कार्यक्रम घेण्यात आला. दि. 31 जाने. 2024 ला इतिहास विभाग आणि राज्यशास्त्र विभागाच्या वतीने अभ्यास मंडळाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पी. डब्ल्यू. एस. कॉलेजचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. पाटील सर यांनी अभ्यास मंडळाचे उद्घाटन रीतसर करून राज्यशास्त्राचे आजचे स्वरूप लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी कृतिप्रवण बनावे, असे मार्गदर्शन केले. तर पी एस डब्ल्यू कॉलेजचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुशांत चिमनकर यांनी राज्यशास्त्राचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आपला शैक्षणिक विकास कसा साधावा यावर भाष्य केले. 2 फेब्रुवारी 2024 ला भाषिक पंधरवड्याचा समारोपीय कार्यक्रम डॉ. लता जाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मा.श्री. वसंतरावजी झाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. अध्यक्ष मा. झाडे सरांनी विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याला हा पंधरवडा कसा महत्त्वपूर्ण आहे यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधला जातो, यावर भाष्य केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. लता जाणे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी सर्व सहकारी प्राध्यापकांनी सहकार्य केले आणि पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन डॉ. लता जाणे, मराठी विभाग यांनी केले. सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा यामध्ये उस्फूर्त सहभाग होता.
ई खबर मीडिया के लिए शिवशंकर राजपूत की रिपोर्ट